About Me

माझे अस्तित्व अजून ओळखायचे बाकी आहे.... 'रेणू' तरी म्हणू कशी मी स्वतःला ? विश्वातला या 'अणू' तरी आहे की नाही, हे ओळखायचे बाकी आहे....

Thursday, September 27, 2007

वस्त्रहरण भाग=5"पळून लावला, घाव त्याने जिव्हारी.."

वस्त्रहरण भाग=5"पळून लावला, घाव त्याने जिव्हारी.."
माझ्या मते विडंबन म्हणजे मूळ कवितेच्या मूळाला हात घालून ती विनोदी बनवणे.... यात मूळ कवितेचा अर्थ आणि गांभीर्य राहत नाही हे नक्की... पण त्या कवितेला उजाळा नक्कीच मिळतो....मूळ कविता आहे योगेश जोशीजी यांची... सर्व प्रथम त्यांची माफी मागते......आता हे इतके औपचारिक आणि गंभीर मी कसे बोलले? हे मलाही कळेना... जाउ द्या,कधी कधी झटके आले की असेच बोलते मी...(झटके आले की लागले ?...)जाउ द्या, आपण विडंबन वाचूयात...नाहीतर एक मोठे लेक्चर देईन.देऊ का?माहितेय तुम्ही "नाही....नको" म्हणताय....म्हणूनच म्हणतेय तुम्ही वाचा....कारण,"वाचाल, तरच वाचाल....."


mul kavita....
"शस्त्रास लागलेला, घाव तो जिव्हारी..."

फेकावयास निघालो,दु:खे झाडुनि सारी,
मनाची दलाली, वेदनांच्या बाजारी.

कोंडलेला श्वास, मोकळा फुटु पाह्तो,
आकाश थकलेले,घेऊ कशी भरारी?

ओहोटला सागर, भय किनार्यांचे,
लागु आता कसा मी,अन कुठल्या किनारी?

युध्दाची मज का खबरबात नव्हती,
स्वप्राणे फुंकलेली,आजारी तुतारी.

टेकावयास माथा,तुज आळवावयासी आलो,
बंद दारे , झोपलेले पुजारी.

युध्दात मज दिसल्या,जखमा माझ्या उरीच्या,
शस्त्रास लागलेला, घाव तो जिव्हारी.

मुखवटा टाकुनि,आता स्वत:लाच पाहावे,
प्रतिबिंबाने दिली,आरश्याला सुपारी.

मोजलेही असते,मी नभांगणातील तारे,
जगण्यातच सारी,अडकली हुशारी.

अम्रुताच्या प्यालात, विष संमिश्रलेले,
पिणे ना-पिणे, होईना मनाची तयारी.

पाहुनि त्याला,दु:खे माझी लाजली,
फिरताना पाहीला मी,अश्वत्थामा नर्मदेकिनारी.

चिताग्नीतही आज,मी पोळलो न जरासा,
म्रुत्युच्या दारी,जीवनाची लाचारी.

पाश ही इथले, असे मोहमयी,
पुन:पुन्हा आलो,इथे मी माघारी.
----योगेश जोशी

बिडंबनाचे नाव आहे.......
"पळून लावला, घाव त्याने जिव्हारी....."

विकावयास निघाले, रद्दी झाडूनी सारी
कविता-पाने घेणारा,शोधतेय बाजारी....

कॉंडलेला हुंदका, मोकळा फुटू पहातो
वेदना थकलेल्या, नी शब्दांचीच भरारी...

ओहोटलाय का सागर? रद्दी घेणार्‍याचा
विकू रद्दी कशी मी, अन् कुठल्या किनारी....

रद्दी-दलालही मिळेना, खबरबात नव्हती
स्वप्राणे फुंकलेली, रद्दी सारी आजारी....

टेकवेल माथा तुज आळवावयासी आले...
बंद का दारे? पळाला दलाल ही....

नाही का दिसल्या, जखमा माझ्या उरीच्या
पळून लावला, घाव त्याने जिव्हारी....

मुखवटा टाकुनी आता स्वतःला पहाते
कवी मनास दिली, माझी मीच सुपारी....

मोजलेत अक्षरशः मी नभांगणातील तारे
(पण नवरा म्हणतो....)
कमवण्यात अडकवा, आपली हुशारी....

प्रकाशकाकडे गेलेले घेऊन भाव संमिश्रलेले
छापू- न छापू? होईना (त्याच्या) मनाची तयारी...

पाहूनी त्याला, लाज मला वाटली....(इतक्यात),
फिरताना पहिली मी ,रद्दिवाली, त्याच किनारी....

(एकवून तिला एखादी कविता रद्दी विकावी सारी...असे वाटले आणि...)

चेहर्यावर तिच्या, भाव उठला ना जरासा
घे म्हटले रद्दी, न संपव लाचारी...

म्हणे, घाल ती पाने चूलीत सारी....
असल्या पत्रावळ्या आणू नकोस माघारी.....

रेणुका @ एक झोका... चुके काळजाचा ठोका... 27/9/2007........11 a.m.

"शब्दांतून एकमेकांचं अस्तित्व पुसलय...."

"शब्दांतून एकमेकांचं अस्तित्व पुसलय...."

शब्दांतून एकमेकांचं अस्तित्व पुसलय....
पण मनातून कसं पुसता येईल?

अश्रूंसकट त्याला डोळ्यात कोंडलय....
पण झुरणं कसं थांबवता येईल?

आठवणींचं जग माझ्या नावावर केलय...
त्याचं साम्राज्य कसं नाकारता येईल?

नजरेआड, शब्दांआड नियतीनं केलय....
पण व्यथेतलं सामर्थ्य लेखणीत कसं येईल?

रेणुका @एक झोका....चुके काळजाचा ठोका...25/9/2007....1.20 a.m.

डोळे जादुगार" भाग=5....मन्मनीची भाषा....."

डोळे जादुगार" भाग=5....मन्मनीची भाषा....."

मन्मनीची भाषा
सखयाला कळेल का?
न बोलताच, हे
नाते जुळेल का?

वेड सखयाचे
मनास लागले असे...
भान हरपले
मन हे वेडेपिसे....

सुरेल तराणे
छेडण्याचे वेध लागले...
स्वप्न भरारीचे
मग वेड लागले...

ओठ पाकळ्यांना
जरी मिटून ठेवले.....
नयनीच्या भावाने
भेद हे खोलले...

बोलले ग बोलले
मन हे आज डोलले...
भेद खोलूनी गडे
नयन आज लाजले...

रेणुका @एक झोका...चुके काळजाचा ठोका...25/9/2007.....1.15 p.m.

Monday, September 24, 2007

"पापण्यांच्या काठावर स्वप्न मागे ठाव...."

एक मनातले नाव
आठवणींचा गाव....
पापण्यांच्या काठावर
स्वप्न मागे ठाव....

निद्रा दूर गावी
त्याची वाट पाही....
हास्याला कुलूप
का त्याकडे चावी?

एक उष्ण उसासा
मन रडे ढसासा...
विरह का असा?
जीव व्हावा नकोसा....

जीव जीवात गुंतला
पाय 'माये'त रूतला...
वर्मी घाव घातला
सभार्या परतला.....

एक हास्य लकेर
मग एक शिरच्छेद....
थरथरता कबन्ध
तो चितेमधे बंद....

थंड झाली गात्रं
तरी इच्छा एकमात्र....
नसानसातला बदला
आत्म्यामधे साचला....

एक किर्र रात्रं....
एक भेसूर हास्य....
जीवन मागे दास्य
तरीही एक भेसूर हास्य....

हा हा हा हा हा.....
पुन्हा एक शिरच्छेद

पुन्हा एक शिरच्छेद
थरथरता कबन्ध.....
पुन्हा चितेमधे बंद
आत्मा आता बेबन्द...

रेणुका @ एक झोका ..... चुके काळजाचा ठोका.....23/9/2007......11.05 a.m.

वस्त्रहरण भाग = 4"कुठंवर असं फरफटत नेशील........?????

वस्त्रहरण भाग = 4 "कुठंवर असं फरफटत नेशील?????"

चला तर मंडळी अजून एक विडंबन घेऊन आलेय....आता हे आहे सनिदांच्याच एका गझलचे विडंबन.....मी त्यांच्याच मागे का लागलेय हात धुवून? कारण ते माझे मोठे भाऊ आणि मी त्यांच्या पाठची आहे ना? मग पाठीमागेच लागणार.....माहितेय bad joke आहे हा, पण मी करणारच.....माझा हक़क़ आहे तो...मी घेतलेला....तर हेही विडंबन नवीन प्रकारचेच!
नवीन काय त्यात, हा सवयी प्रमाणे तुमचा प्रश्न! आता उत्तर......

1.पहा, पहिले विडंबन करणे हा प्रकार माझ्यासाठी 'नवीन' होता...
2.दुसर्या विडंबनात...'विनोदी कवितेचे विडंबन' ह्या 'नवीन' प्रकारचा मी शोध लावला (हो, तो शोध मीच लावलाय.....स्वतिनेही मान्यता दिलीये त्याला....)3.तिसर्या विडंबनात....गझल युक्त पझल, की पझल युक्त गझल असा 'नवीन' शोध लावला.......(आला की नाही तिन्हित 'नवीन' हा शब्द....)
4.आता या चौथ्या विडंबनात 'नवीन' असे काही नाहीच....आहे की नाही यात पण 'नवीन' हा शब्द........मग?तर हेच नवीन यातले की काहीच नवीन नाही........

hi ahe original gazal....mala vidamban type karayachey ajun..tovar hi vachayachi asate...

"कुठवर जिवना तू मला, असं फरफटत नेशील?????......"

कुठवर जिवना तू मला, असं फरफटत नेशील
निखाऱ्यां वरून कापसाला, असं खरचटत नेशील

नाही ईच्छा पावलांची, मखमलावर चालण्याची
मृत्यू तूही का मला, असचं बरबटत नेशील

आलो कोरड्या दूनियेत, मी माझेचं अश्रूं पुसाया
कोणा एकाच्या तरी, आठवणीत जगवत नेशील

खाली रुतलो चिखलात, वर फेकून दे नर्कात
स्वर्ग कसा असतो, तो तरी दाखवत नेशील

कधी मागितला तुझ्याकडे, सहा मिटर कापड
खिशातून काढून रुमाल, चेहरा झाकत नेशील

डिवसलं वेदनांनी सदा, जगलो तोवर
जाताना तरी त्याचा, डोळा चुकवत नेशील

चंदनाच्या लाकडासवे, जळण्याची नाही मनिषा
अग्नीची सोय करून, धर्माने सजवत नेशील

हजारो सजीवां मधून, एका निर्जीवाने का जावं
चार खांद्याच्या तरी, पालकीतून गाजवत नेशील

वस्त्र माझे धुतलं, डाग जे त्यांचे होते
माझ्या चरीत्र्यावरचे डाग, पुसत नेशील

का असंख्य डोळ्यातून, मी थेंब थेंब गळावं
तीच्या दोनच अश्रूंत, मला भिजवत नेशील

@सनिल पांगे

विडंबन आहे, बाळ्या आणि शालीच्या लग्नानंतर जी वरात निघते, त्याचे,हा प्रकार इथे सर्वाणाच माहीत असेल,आणि नसला तर माहीत पडेल....आपल्याकडे वेग वेगळ्या type ची 'वरात' असते....ह्या वरातीत पुढे एकच घोडी आहे....लांबन लावत नाही आता.....वाचा!!!!!

कुठंवर ग घोडे तू मला असं फरफटत नेशील?
शेना मातीतूनच का मला असं घसरवत नेशील?
(बरं झालं, बाळ्याने धोतर घातले नव्हते...)

आहे इच्छा मधूचंद्राची, मखमलीवर चालण्याची...
वाटल्यास मला नंतर कुठेही ने, मी कसाही येशील

आग थांब! खाली रुतलोय चिखलात मी......गधडे
(आता घोडीला राग आला, बरं का.....)
चुकलो, चुकलो! लाथा मारणे आता तरी थांबवशील?

नको मला इतक्यात नरक वा स्वर्ग दाखऊस....
शालीचा photo तरी at least घेऊ देशील?
(एव्हढ विंग्रजी बाळ्याला येते हो.........)

मागितला नाहीस जरी तू मला 6 वार कपडा...
(घोडी विचारात.....कशाला कपडा?)
तरी तुला साडी चोळीचा आहेर मी देशील.....
(घोडी परत विचारात.....आहेर कशाला? बाळ्याचा आपला म्हस्का हो....)

मेल्यावर मला जळण्याची जाम आहे मनीषा.....
(हे ऐकून तरी घोडीला दया येईल असे वाटले त्याला.........पण घोडीला परत प्रश्न! आता ही मनीषा कोण? घोडी जास्त डोके वापरायच्या फंदात पडत नाही......)कड्यवरून ढकलून न देता परत स्मशाणात आणशिल?
(आता घ्या, म्हणजे न्या तर न्या आणि याला परत पण आणा!!!!!!!!)

हजारो सजीवांसमोरून फरफटत आणलेस मला...
(आला का कोणी वाचवायला?.....)
पण चार खांदे द्यायला बघ सर्व धावून येतील.......

आता एव्हढ बरबटल्यावर, डाग किती धुवावे?
ही कापडं फेकून द्यायला शालीला तू सांगशील?
(घरात surf excel नाहीए ना........)

माहितेय मला माझ्या लग्नात तुला घोडा दुरावाला....
पण बये, सोड्लेस तर तुझा टाका मी जुळवूनही देशील.....
(बाळ्या आपला तिचे mind, change करायच्या प्रयत्नात......)

(घोडीने नीट वरचे ऐकले नसावे....नाहीतर लगेच थांबली असती.......)
बाळ्या तरीही प्रयत्नानातच.....

मी असं का असंख्य अश्रुतुन थेंब थेंब गाळावं....?????
शालीचे दोनच अश्रू पाहण्यासाठी तरी जिवंत सोडशिल?
(घोडी झाली हो emotionally blackmail......... सोडले तिने.....)

रेणुका @ एक झोका.........चुके काळजाचा ठोका........22/9/2007......1.40 a.m.

वस्त्रहरण भाग=3..."येणार त्या क्षणांची तकदीर सक्त आहे.........."

वस्त्रहरण भाग=3..."येणार त्या क्षणांची तकदीर सक्त आहे.........."

आता नावावरून कळलेच असेल कोणाच्या गझलचे वस्त्रहरण आहे हे......... [ज्यांना नसेल कळले त्यांच्य साठी...सोनालीची गझल आहे हो ही........."येणार त्या क्षणांची तकदीर वक्त आहे......"]गझलचे विडंबन करता येते हे मात्र मला नक्की माहीत आहे....[विनोदी कवितेचे होते की नाही हे माहीत नव्हते ना, म्हणून सांगितले....बाकी काही नाही....]तर मंडळी, हसायचे नाही........पेश आहे माझी 'पझल' .....पेश हा शब्द यासाठी की सोनाली ताईनि गझल मधे हिंदी शब्द आडवे तीडवे खुपसलेत ना? म्हणून हो.... ही आपली माझी सवय, बाकी काही नाही....आता पझल हा शब्द का वापरला? ह्याचा शोध मलाही लागायचाय....ते जाऊ द्या, तुम्ही मंडळी खूपच चौकस हा, मला आवडत नाही हे..... वाचा हो, जे काही मी लिखेल ते.....(ही माझी सवय हो, संगितलेय ना आधीच....)
ही सोनाली ची मूळ गझल.....

येणार त्या क्षणांचे तकदीर वक्त आहे
आहेत त्या क्षणांना आयुष्य फ़क्त आहे

स्पर्शात हिरे पाचु, मोतीच चुंबनात
अनुभुतीचे सुवर्णी धन, येथ गुप्त आहे

मज आजवर शिकायत त्यांच्या खिलाफ़ होती
ही आज खंत, त्यांच्या विना मी मुक्त आहे

शोधित राजरस्ता ती शापभ्रष्ट मंजिल
वरदान काजव्यांचे घाटात लुप्त आहे

आशा उभारणीच्या विसरुन आण-भाका
आपल्याच पडझडीच्या चिंतेत व्यस्त आहे

विमनस्क बाज होता भरोशातल्या नशेला
इल्जाम भोगुनी हा इतिहास नष्ट आहे

कुठल्याच मस्तकी ना सरताज शाश्वतीचा
बेघर सलामतीचे बेताज तख्त आहे.

-सोनाली

ani he tya kaviteche vatole......... i mean vidamban....
"येणार त्या क्षणांची तकदीर सक्त आहे.........."

येणार त्या क्षणांची तकदीर सक्त आहे.....
मला भेटला तो, तो एक मख्ख आहे....

स्पर्शातले हिरे पाचू त्या मख्खाला कळेना.....
अनुभूतीचे की हो त्याला, जगच लुप्त आहे.....

आजवर शिकायत त्याच्या खिलाफ होती.....[donada mhana hi line.....]
पण आता गाढवाला देणार मी वक्त आहे.....

शोधते राजरस्ता, त्याला द्याया मन्झिल....
वरदान मख्खपनाचे त्यालाच का फक्त आहे?

विसरायला, कुठे हो घेतल्यात आणा भाका
त्याला सुधारविण्याच्या चिंतेत व्यस्त आहे....

ताज तख्त डोंबलाचे, अन् गुमशुदा होता तो....
इल्जाम देऊ कुणाला? म्हणून मी त्रस्त आहे....

बेघर, आणि कमालीचा भावना शून्य होता.....
पागलखाण्यातून पळालेला तो एक 'पागल' होता....

[ata kalale asel mi 'puzzle' ka mhatale te........]

रेणुका @ एक झोका.... चुके काळजाचा ठोका....20/9/2007.....1.45 p.m.

Sunday, September 23, 2007

वस्त्रहरण bhag=2.." "वाटला तितका सोप्पा होता का मृत्यू पूर्वीचा उद्योग माझा ??????"

वस्त्रहरण bhag=2.." "वाटला तितका सोप्पा होता का मृत्यू पूर्वीचा उद्योग माझा ??????"

ही कविता आहे माझ्या, इथल्या सर्वात आवडत्या कविंची......माझे मोठे भाऊ आहेत ते, म्हणूनच हे धारिष्ठ ! सनीलदा हो, योगेश ने त्यांचे नाव "बनेल....मी खोडकर" असे ठेवलेय....तेच ते....आता हे विडंबन नवीन प्रकारचे आहे.... त्यात नवीन काय? हा सहाजिकच तुमचा प्रश्न असणार.... म्हणून आधीच उत्तर देतेय......[विसरलात का? पुणेकर ना आम्ही,....मग वाटेल ते बोलातोच in advance....]नवीन या साठी की विनोदी कवितेचे विडंबन करत आहे....आता विनोदी कवितेचे विडंबन होते का ? हा प्रश्न तुमच्या सारखाच मलाही पडला होता, पण संशोधन हा प्रांत आपला नाही, हे मी मानते....[तसे आम्ही लोक खरेच बोलतो हो....] तर मग यावर संशोधन करायला स्वातीला संगितलेय..[स्वाती कोण हे विचारू नका हं....पण तुम्ही विचारणारच...म्हणून सांगूनच टाकते....(शेवटी पुणेकरच.....) तीच ती हो, नक्षत्रांचे देणे म्हणा नाहीतर अनॉखे मोरपीस म्हणा..... तीच ती..... संशोधन हे क्षेत्र तिचे....घाबरू नका, तिला संगितलेय मी, पी एच डी मिळवायचा प्रयत्न करू नकोस या विषयावर....लवकर काय तो निकाल सांग.... नाही तर मी इकडे 5 -50 विनोदी कवितेन्चे वस्त्रहरण करेन आणि मग सांगशील की, अग हे असे करता येत नाही.... तर ती सांगेन लवकरच....[कारण तीही पुणेकरच हो.....]तर विडंबन कवितेचे नाव आहे...."वाटला तितका सोप्पा होता का मृत्यू पूर्वीचा उद्योग माझा ??????"

original poem....... tovar hi vacha....
वाटला तितका सोप्पा नाही मेल्या नंतरचा प्रपंच माझा


काय म्हणता, आज कोणी
माझं तेरावं घालून गेलं
मी तर ऐकलेलं, की साऱ्यांनी
ते परवाच साजरं केलं

छे छे, किती हा घोळ
मी किती तो सहन करणार
जन्मभर कणकण मारलत
मरूनही कितींदा मरणार

जिवंत असे पर्यंत कोणीच
मला मनात साठवलं नाही
एक गिळणारा कमी झाल्याचं सुख
मेल्यानंतरही कोणी आठवलं नाही

पींडाला शिवायला आम्हां कावळ्यांना
कितींदा म्हणून यावं लागणार
आमचंही "वैयक्तिक जिवन" आहे
अडथळा कितींदा सहन करणार

ते सर्व जाऊ द्या.........
मित्र मंडळी कुठे दिसत नाहीत
कुठे मेले नाहीसे झालेत
मी गेल्याच्या दु:खात बुडून
सारे बिचारे किती प्यालेत

"पक्या" किती रडला बिचारा
एक एक अश्रूं त्याचा फसवा
उधारी फेडावी लागणार नाही
प्रचंड काळजीत बहूदा असावा

"बंड्या" चे अश्रूच थांबत नाही
"गोमू"चं सांत्वन करण्यात बुडालायं
आधीचं जळायचा आमच्या प्रेमावर
आता तर पुर्ण रस्ता मोकळा झालायं

एकच तो खरा मित्र "सुदामा"
कोणाशी हसतं नाही,बोलत नाही
मी त्याला सोडून गेल्याचं सत्य
त्याच्या डोळ्यांतून काही हलत नाही

तर असा गोंधळलेला पात्र मी
तारेवरची कसरत, मंच माझा
वाटला तितका सोप्पा नाही
मेल्या नंतरचा प्रपंच माझा

@सनिल

"वाटला तितका सोप्पा होता का मृत्यू पूर्वीचा उद्योग माझा ??????"

तसं हे कधी कबूल केलं नसतं,पण आता कुठे फरक पडतोय....
कुठे काही बोलू नका, माझं तेरावं मी जिवंतपणीच जेवलोय.....

नकळतच जेवलोय, कारण कोणीच मला सांगितलं नव्हतं.....
फुकटचं जेवायला मिळतय म्हणून मीही विचारलं नव्हतं......

असो, पण खरच सांगतोय.....
वाटला तितका सोप्पा नव्हता मृत्यू पूर्वीचा उद्योग माझा .....
पाच जनिन्वर प्रेम होतं, अन् मस्त राजबिंडा थाट माझा....

प्रेम यासाठी म्हटलं, कारण लफडं आपण कधी केलं नाही.....
एकीवरचं प्रेम करावं, असं कुठल्याच ग्रंथात लिहिलेलं नाही.....

आता पाच जणींना सांभाळायला कमी का कष्ट पडतात...???
कष्टाची कदर नाही कुणाला,लोक उगाच दमदाटी करतात.....

पण या उद्योगात, एक लफडं झालं, चूक म्हणा हवं तर, पण झालं....
दोघी निघाल्या सख्ख्या बहिणी, नि घरानं निघालं पोलिसावालं......

बरं, सटकू म्हणालो इथून तर, पोलिसी खाक्या अजब होता.....
मृत्यूपूर्वीच xxxनी आमच्या तेराव्याचा program आखला होता.....

एक पोरगी असती तर, बन्दोबस्तात लग्नं लागणार होतं....
नशीबच फुटकं! via encounter आमचं तिकीट निघालं होतं....

पोलिसच ते, त्यांनी शेवटी आमची रवानगी 'वर' केली.....
आमच्या मित्रांसोबतच मग त्यांच्या पोरींची लग्नं झाली....

काय सांगू? मित्रही अशा वेळी मलाच शिव्या देत होते....
आणि खरोखरच्या तेराव्यात जेवणावर ताव मारत होते......

दुःख मारणाचे नाही, पण निदान लग्नानंतर तरी मारायचे होते....
त्या पाच नाही तरी, सहाव्या गौरीसाठी तरी झुरायला द्यायचे होते.....

(गौरी इथे कोणी असेल तर, माफ कर बरं का.......हे सहज आठवलेले नाव....)

रेणुका @ एक झोका.....चुके काळजाचा ठोका.....20/9/2007.........1.00 p.m.


वस्त्रहरण bhag 1="कणा" कवितेचे विडंबन............

वस्त्रहरण bhag 1="कणा" कवितेचे विडंबन............

विडंबणाच्या क्षेत्रात माझे हे पहिलेच पाऊल........ आता पाऊल टाकायचे तर हळू हळू, जपून टाकावे पण नाही, पुणेकर असले काही मानत नाहीत हो, सवय, बाकी काय? तर आता घ्यायाचीच आहे उडी तर समुद्रातच घ्यावी म्हटले......... आणि कुसुमाग्रजांच्या प्रसिद्ध कवितेस हात लावायचे धाडस करतेय...... त्यांची कविता तशी काही मिळेना...एका ठिकाणी मिळलीये त्याची ही लिंक........http://pallavigalgali.blogspot.com/2005/06/kana-marathi-poem.html

विडंबन म्हणजे कवितेचे वस्त्रहरण...... म्हणून मी माझ्या विडंबन कवीताना या नावाखाली सादर करत आहे..... आपण स्वीकाराल या कविता, हे गृहीत धरूनच!!!!!!!!

सर तुम्हीच सांगितले होते ना,
जा आणि तिच्या कडून notes घे.....

शिकवले नाही तर काय झाले?
notes वाचून परीक्षा दे.....

म्हणून गेलो, नी खड्ड्यात पडलो
कणा मोडला पण प्रेमात पडलो....

तिला फक्त 'देतेस का?' विचारले....
माहीत नाही ,तिच्यावर का आभाळ कोसळले?....

notes एवजी तिने frdship असा अर्थ घेतला....
(नी पुढे बोलायाच्या आतच )एक धक्का जोरात दिला.....

पडलो एकदाचा खड्ड्यात,
आणि मोडला माझा कणा....

पण काहीही असो सर,
परत एकदा लढ म्हणा....

मी तर म्हणतो सर,
तुम्ही कधी शिकउच नका...

notes 'परत आण' म्हणायला,
जराही कचकू नका....

रेणुका @ एक झोका...चुके काळजाचा ठोका......20/9/2007....1.45 a.m.
"डोळे हे जादुगार"....भाग=4:"नयन तिचे जादुगार........"

नयन जादुगार प्रीयेचे
अस्से म्हणून छळतात...
रात्रंदिन माझ्यावर ते
कडा पहारा देतात....

काय सांगू तुम्हाला
नयनांची त्या जादू...
करते मला 'चित' नि
मन होते बेकाबू....

अस्से वाटते तिला
आपले सर्वस्व द्यावे....
नि जादूच्या राज्यात
आपण कायम हरवावे....

त्या जादुई दुनियेत
आत जायला मिळावे....
नको, मला तिथले
कायमचे नागरिकत्वच मिळावे....

काही तरी करा ना...
हे अस्से होण्यासाठी....
जादूच्या त्या राज्याचे
मला राज्य मिळण्यासाठी....

रेणुका@एक झोका.....चुके काळजाचा ठोका...13/9/2007....11.40a.m.

"डोळे हे जादुगार"....भाग=3"ठकवणारे डोळे...."

"डोळे हे जादुगार"....भाग=3"ठकवणारे डोळे...."

आमच्या मनांचा रस्ता
डोळ्यांतून गेला होता....
एकमेकांकडे झुकताना
डोळ्यांचाच हात होता....

डोळेही मज ठकवतील
असे वाटले नव्हते कधी....
विश्वास पूर्ण टाकताना
हे जाणवलेच नाही कधी...

लडीवाळ नजरेंमागे त्या
एक खेळी सुरू होती...
शब्दांना साथ त्याच्या
डोळ्यांनी दिली होती....

नजरेतला डाव त्याच्या
हाती घावला नव्हता....
नि निरगासपणा हिरवताना
तो जराही धजला नव्हता....

त्याच्या डोळ्यांनी दगा
असा कसा हो दिला?
की माझ्याच डोळ्यांनी
माझा घात होता केला?

'घात', 'आघात' हा, की?
'अपघात' होता कळेना....
डोळ्यांच्या भाषेचे हे
गुपित मात्र उलघडेना....

म्हणून मी आता,खरच
डोळे माझे मुके केलेत.....
सुन्न डोळ्यांनीच जगणे
आता मी पसंत केलेय....

रेणुका@एक झॉका...चुके काळजाचा ठोका...13/9/2007......11.20a.m.

Wednesday, September 12, 2007

"औन्दा लगीन करायचं..." :भाग=3= "आजच लगीन हाय...."

"औन्दा लगीन करायचं...": भाग=3="आजच लगीन हाय........"

न्हाय-व्हय करत करत..... आजच लगीन व्हणार् हाय....
बाळ्या न शालीच्या लग्नाला बघा, तुमाला यायचं हाय.....

काय म्हन्ता??? अरेच्चा!!!! आमान्त्रन न्हाय मिळालं?
पत्ता दिलता का बराबर??? मग? म्हणूनच आसं झालं....

राहू द्या की, बाकी हेच "आमान्त्रन" समद्यान्ना हाय....
आन् व्हय ,मंडळी, आहेर आणायचा विसरायचा न्हाय....

त्याचं काय ये, दारात आमी दोन पैलवान उभं केलय...
आहेराशिवाय सोडायचं न्हाय आत,आसं संगीतलय....

बिगी बिगी या बरं का मंडळी, जरा लगीन घाई हाय.....
हा, पण तेव्हढ आहेराचं अजिबात विसरायचं न्हाय......

आशीर्वाद म्हणताय का? ते मिळतील आहेरतच....
बाकी आपलं तेव्हढ ....हा, तेच, लक्षात ठेवायचं.....

आणि व्हय, जेवायला अजिबात विसरायचच न्हाय....
त्याचं काय ये,हजार माणसांचा सैपाक बनवलाय....

हा, आणि जेवणानतर लक्षात हाय ना घरी जायचं....
नाव घेतल्या बिगार मातुर कोणी नाही हालायचं....

हा, आणि विसरायच नाही हा, ते न्हाई ओ....ते तर तुमि आणणरच....
पैलवानाचं म्हणत व्हते मी, तर नाव घेउनच निघायचं......[:D]

रेणुका@एक झोका...चुके काळजाचा ठोका.......
12/9/2007.......12.50a.m.

"आम्ही पुणेकर........."

पुणेकरहो राग मानायचा नाही हं!!!!!!!!! Plzzzzz कोणीही राग मानू नये.......कोणाला उद्देशून लिहिलेले नाहीए...जसे सुचत गेले तसे लिहिलेय........ विनोदी लिहीण्याचा प्रयत्न....बस्स....

"आम्ही पुणेकर........."

आम्ही पुणेकर किनई ,
सोडत नाही बोलायचा chance....
वाटल्यास आम्ही बोलतो,
जे वाटेल ते in advance.....

खदाड खाऊ आम्ही,
पाणीपुरी वा pizza, फडशा पडतो....
बाकी खायच्या बाबतीत आम्ही,
सर्वांना minitaत मागे सारतो....

system विरुद्ध आम्ही,
तसे भर भरून बोलतो...
आणि वेळ येताच शेपूट,
आत घालून देखील पळतो...

अगदीच असे नाही हो,

कधी कधी आमच्यात
शिवाजी महाराजही संचरतो....
भले जयंती दोनदा साजरी करो....
पण साजरी तर करतो.....

आम्ही traffic rules
धाब्यावर देखील बसवतो.....
आणि वर मान करून,
मामाला 'मामा' बनवतो.....

galsच्या बाबतीतही आम्ही
अजिबात backward नाही....
ये नही और सही....
इथे कोणाला आहे घाई???

शनिवार वड्या बद्दल
आम्हाला खूप अभिमान आहे...
भले तिकडे फिरकत नसू,
पण कोणाची बोलायची टाप आहे?

तसे आमचे नेहमी असते,
बेफिकीर नि धम्माल जिणे...
कारण, पुणेकरच आम्ही,
इथे नसते कशाचेच उणे....

त्याचे काय आहे....

उणं कशातच असू नये,
आजवर हेच आलोय शिकत....
उगाच नाही पुण्याला,
शिक्षणाचे 'माहेरघर' म्हणत....

(आम्ही पुणेकरच हो..........)

रेणुका@एक झोका....चुके काळजाचा ठोका....
12/9/2007.....1.30 p.m.

"डोळे हे जादुगार...": भाग 2="प्रेयसी..."

"डोळे हे जादुगार...": भाग 2="प्रेयसी..."

काय करू? माझी प्रेयसी बोलतच नाही......

पण,
डोळ्यांच्या कोपर्‍यातून हसते तेव्हा,
शुक्र तार्‍यासारखी भासते....
कधी टापोर्‍या मोत्यांच्या लडीतून ती,
मुसमुसूनही रडते.....

डोळ्यांतूनच कधी निशब्दपणे ती,
स्वप्नेही मनी पेरते....
नि त्यांना साकार करण्याची जिद्द,
डोळ्यांतूनच देते....

डोळ्यांच्या बाहुल्या नाचवत ती,
अवखळही बनते.....
तर त्याच बाहुल्या स्थिरावून ती,
अवघड निर्णयही घेते....

अशी ही प्रेयसी माझी...
अबोल नि लाजाळू, अबोलीची कळी....
शब्दांपेक्षा जास्त तिला
ही नयनाची बोली......

पण खरं सांगतो मित्रांनो,

म्हणून मला तिचे डोळे
खूप खूप आवडतात......
तिच्या मनाची आंदोलने
ते माझ्यजवळ बोलतात........

रेणुका@ एक झोका.....चुके काळजाचा ठोका......
11/9/2007........4.40.....p.m.

"डोळे हे जादुगार" : भाग 1="फितूर डोळे झाले नसते तर.."

"डोळे हे जादुगार" भाग 1"फितूर डोळे झाले नसते तर.."

अशोकजी नेहमी छान छान अवतरण मला स्क्रॅप करत असतात.....त्यापैकी एक.....

अशोक : डोळे अनंत प्रकारचे असतात. विलक्षण वाचाळ असतात. पक्के अबोलही असतात. पाण्यासारखे पारदर्शक ही असतात आणि शाळिग्रामासारखे गोंडस पण थिजलेलेही असतात. कमळासारखे उमललेले असतात आणि संध्याछायांसारखे कोमेजलेलेही असतात. लपविणारे असतात आनी भलतेच ठकविणारेही असतात. डोळे श्रावणातल्या कोवळ्या ओलसर उन्हासारखे आल्हाददायक असतात नि वैशाख वणव्यासारखे रौद्र्प्रखरही असतात.काही डोळे जागच्या जागी बंदिस्त करणारे असतात. गारुड करणारे असतात. काही जिवाला दिलासा देणारे,शहाळ्याच्या पाण्यासारखे असतात.
(परमहंस * रवींद्र पिंगे )

या वरुन मला डोळ्यांवर काहीसे लिहावेसे वाटले आणि तेही मला लिही म्हणाले..........पण ज्या वेळी मी लिहायच्या दृष्टीने विचार करायला लागले, त्यावेळी मला खूप विषय एकाच वेळी सुचत होते......... मग नक्की कशावर लिहावे? म्हणून म्हटले 2-4 तरी कविता नक्की लिहिता येतील या जादुई डोळ्यांवर.....मग प्रयत्न केलाय लिहायचा म्हणून एकाच सदराखाली कविता भाग नंबर देऊन लिहीत आहे..... आवडतील की नाही माहीत नाही...... पण बघा वाचून....

"डोळे हे जादुगार......" भाग 1......"फितूर डोळे झाले नसते तर...."

गंभीर नि निश्चयी बनून आज मी,
नियतीसमोर झुकायला निघालेय.....
आतून जरी पूर्ण मोडलेय...... तरी,
आज त्याला तोडायला निघालेय.....

करारी बाणा, घातक निर्णय,
नि शब्दांची तळपती तलवार......
मात्र माझ्याच डोळ्यांची मला,
आडवी येत होती आज ढाल.........

तरीही, 'हो',... तरीही, कणखर बनून,
त्याला आज तोडायचेच होते.........
नि माझे अस्तित्व मलाच आज,
त्याच्या काळजातून पुसायचे होते....

इतके सगळे जमवलेही.... मी,
पण, फितूर डोळ्यांनी घात केला.....
नि माझा लटका कणखर बाणा,
क्षणात त्यांनी धुळीत मिळवला.......

फितूर डोळे झाले नसते,
तरचित्र नक्कीच वेगळे असते....
आम्ही रडलो कढलो जरी,
आमचे देह हयात असते.......

जीवित पणी नसलो जरी,
तरी,आज आम्ही खुश आहोत.....
मृत्यूनंतर एकरूप होऊन,
आज गालात हसत आहोत

रेणुका@एक झोका....चुके काळजाचा ठोका.....
11/9/2007......3.05 p.m.