About Me

माझे अस्तित्व अजून ओळखायचे बाकी आहे.... 'रेणू' तरी म्हणू कशी मी स्वतःला ? विश्वातला या 'अणू' तरी आहे की नाही, हे ओळखायचे बाकी आहे....

Thursday, August 21, 2008

खोल हे गुपित(?) जे स्तब्ध....

सूर्याचा होऊ दे अस्त, थांबू दे नजरांचे गस्त....
चंद्रास चढू दे बहर, झरु दे धुंदशी लहर......

इश्शारे नको येता जाता, सावर पावलांस आता....
मनी दाटे कातर-वेळ, थांबव हे जीवघेणे खेळ....

मुरु दे रातराणी गंध, उरु दे ध्यास आणि छन्द....
निजू दे पान-फूल-वेली, हसू नको, पाहील ना कोणी....

हाय! एक स्मित कल्लोळ, घातलास ना घोळ?
वेडी-पिशी कावरू की बावरू? पदरास कशी सावरू?

निखळे पैंजण रुणSझुणSS, चारचौघांत कुणकुण....
सख्यांची हलकिशी कुजबुज, ढासळे लाजेचे बुरूज....

कस्से करावे आता... उसळती हस्यांच्या लाटा.....
पाहूनी होऊ नको निशब्द, खोल ना.... खोल हे गुपित(?) जे स्तब्ध....

रेणूका...१०/०४/२००८... १०.३६ A.M.