About Me

माझे अस्तित्व अजून ओळखायचे बाकी आहे.... 'रेणू' तरी म्हणू कशी मी स्वतःला ? विश्वातला या 'अणू' तरी आहे की नाही, हे ओळखायचे बाकी आहे....

Sunday, September 23, 2007

वस्त्रहरण bhag 1="कणा" कवितेचे विडंबन............

वस्त्रहरण bhag 1="कणा" कवितेचे विडंबन............

विडंबणाच्या क्षेत्रात माझे हे पहिलेच पाऊल........ आता पाऊल टाकायचे तर हळू हळू, जपून टाकावे पण नाही, पुणेकर असले काही मानत नाहीत हो, सवय, बाकी काय? तर आता घ्यायाचीच आहे उडी तर समुद्रातच घ्यावी म्हटले......... आणि कुसुमाग्रजांच्या प्रसिद्ध कवितेस हात लावायचे धाडस करतेय...... त्यांची कविता तशी काही मिळेना...एका ठिकाणी मिळलीये त्याची ही लिंक........http://pallavigalgali.blogspot.com/2005/06/kana-marathi-poem.html

विडंबन म्हणजे कवितेचे वस्त्रहरण...... म्हणून मी माझ्या विडंबन कवीताना या नावाखाली सादर करत आहे..... आपण स्वीकाराल या कविता, हे गृहीत धरूनच!!!!!!!!

सर तुम्हीच सांगितले होते ना,
जा आणि तिच्या कडून notes घे.....

शिकवले नाही तर काय झाले?
notes वाचून परीक्षा दे.....

म्हणून गेलो, नी खड्ड्यात पडलो
कणा मोडला पण प्रेमात पडलो....

तिला फक्त 'देतेस का?' विचारले....
माहीत नाही ,तिच्यावर का आभाळ कोसळले?....

notes एवजी तिने frdship असा अर्थ घेतला....
(नी पुढे बोलायाच्या आतच )एक धक्का जोरात दिला.....

पडलो एकदाचा खड्ड्यात,
आणि मोडला माझा कणा....

पण काहीही असो सर,
परत एकदा लढ म्हणा....

मी तर म्हणतो सर,
तुम्ही कधी शिकउच नका...

notes 'परत आण' म्हणायला,
जराही कचकू नका....

रेणुका @ एक झोका...चुके काळजाचा ठोका......20/9/2007....1.45 a.m.
"डोळे हे जादुगार"....भाग=4:"नयन तिचे जादुगार........"

नयन जादुगार प्रीयेचे
अस्से म्हणून छळतात...
रात्रंदिन माझ्यावर ते
कडा पहारा देतात....

काय सांगू तुम्हाला
नयनांची त्या जादू...
करते मला 'चित' नि
मन होते बेकाबू....

अस्से वाटते तिला
आपले सर्वस्व द्यावे....
नि जादूच्या राज्यात
आपण कायम हरवावे....

त्या जादुई दुनियेत
आत जायला मिळावे....
नको, मला तिथले
कायमचे नागरिकत्वच मिळावे....

काही तरी करा ना...
हे अस्से होण्यासाठी....
जादूच्या त्या राज्याचे
मला राज्य मिळण्यासाठी....

रेणुका@एक झोका.....चुके काळजाचा ठोका...13/9/2007....11.40a.m.

"डोळे हे जादुगार"....भाग=3"ठकवणारे डोळे...."

"डोळे हे जादुगार"....भाग=3"ठकवणारे डोळे...."

आमच्या मनांचा रस्ता
डोळ्यांतून गेला होता....
एकमेकांकडे झुकताना
डोळ्यांचाच हात होता....

डोळेही मज ठकवतील
असे वाटले नव्हते कधी....
विश्वास पूर्ण टाकताना
हे जाणवलेच नाही कधी...

लडीवाळ नजरेंमागे त्या
एक खेळी सुरू होती...
शब्दांना साथ त्याच्या
डोळ्यांनी दिली होती....

नजरेतला डाव त्याच्या
हाती घावला नव्हता....
नि निरगासपणा हिरवताना
तो जराही धजला नव्हता....

त्याच्या डोळ्यांनी दगा
असा कसा हो दिला?
की माझ्याच डोळ्यांनी
माझा घात होता केला?

'घात', 'आघात' हा, की?
'अपघात' होता कळेना....
डोळ्यांच्या भाषेचे हे
गुपित मात्र उलघडेना....

म्हणून मी आता,खरच
डोळे माझे मुके केलेत.....
सुन्न डोळ्यांनीच जगणे
आता मी पसंत केलेय....

रेणुका@एक झॉका...चुके काळजाचा ठोका...13/9/2007......11.20a.m.

Wednesday, September 12, 2007

"औन्दा लगीन करायचं..." :भाग=3= "आजच लगीन हाय...."

"औन्दा लगीन करायचं...": भाग=3="आजच लगीन हाय........"

न्हाय-व्हय करत करत..... आजच लगीन व्हणार् हाय....
बाळ्या न शालीच्या लग्नाला बघा, तुमाला यायचं हाय.....

काय म्हन्ता??? अरेच्चा!!!! आमान्त्रन न्हाय मिळालं?
पत्ता दिलता का बराबर??? मग? म्हणूनच आसं झालं....

राहू द्या की, बाकी हेच "आमान्त्रन" समद्यान्ना हाय....
आन् व्हय ,मंडळी, आहेर आणायचा विसरायचा न्हाय....

त्याचं काय ये, दारात आमी दोन पैलवान उभं केलय...
आहेराशिवाय सोडायचं न्हाय आत,आसं संगीतलय....

बिगी बिगी या बरं का मंडळी, जरा लगीन घाई हाय.....
हा, पण तेव्हढ आहेराचं अजिबात विसरायचं न्हाय......

आशीर्वाद म्हणताय का? ते मिळतील आहेरतच....
बाकी आपलं तेव्हढ ....हा, तेच, लक्षात ठेवायचं.....

आणि व्हय, जेवायला अजिबात विसरायचच न्हाय....
त्याचं काय ये,हजार माणसांचा सैपाक बनवलाय....

हा, आणि जेवणानतर लक्षात हाय ना घरी जायचं....
नाव घेतल्या बिगार मातुर कोणी नाही हालायचं....

हा, आणि विसरायच नाही हा, ते न्हाई ओ....ते तर तुमि आणणरच....
पैलवानाचं म्हणत व्हते मी, तर नाव घेउनच निघायचं......[:D]

रेणुका@एक झोका...चुके काळजाचा ठोका.......
12/9/2007.......12.50a.m.

"आम्ही पुणेकर........."

पुणेकरहो राग मानायचा नाही हं!!!!!!!!! Plzzzzz कोणीही राग मानू नये.......कोणाला उद्देशून लिहिलेले नाहीए...जसे सुचत गेले तसे लिहिलेय........ विनोदी लिहीण्याचा प्रयत्न....बस्स....

"आम्ही पुणेकर........."

आम्ही पुणेकर किनई ,
सोडत नाही बोलायचा chance....
वाटल्यास आम्ही बोलतो,
जे वाटेल ते in advance.....

खदाड खाऊ आम्ही,
पाणीपुरी वा pizza, फडशा पडतो....
बाकी खायच्या बाबतीत आम्ही,
सर्वांना minitaत मागे सारतो....

system विरुद्ध आम्ही,
तसे भर भरून बोलतो...
आणि वेळ येताच शेपूट,
आत घालून देखील पळतो...

अगदीच असे नाही हो,

कधी कधी आमच्यात
शिवाजी महाराजही संचरतो....
भले जयंती दोनदा साजरी करो....
पण साजरी तर करतो.....

आम्ही traffic rules
धाब्यावर देखील बसवतो.....
आणि वर मान करून,
मामाला 'मामा' बनवतो.....

galsच्या बाबतीतही आम्ही
अजिबात backward नाही....
ये नही और सही....
इथे कोणाला आहे घाई???

शनिवार वड्या बद्दल
आम्हाला खूप अभिमान आहे...
भले तिकडे फिरकत नसू,
पण कोणाची बोलायची टाप आहे?

तसे आमचे नेहमी असते,
बेफिकीर नि धम्माल जिणे...
कारण, पुणेकरच आम्ही,
इथे नसते कशाचेच उणे....

त्याचे काय आहे....

उणं कशातच असू नये,
आजवर हेच आलोय शिकत....
उगाच नाही पुण्याला,
शिक्षणाचे 'माहेरघर' म्हणत....

(आम्ही पुणेकरच हो..........)

रेणुका@एक झोका....चुके काळजाचा ठोका....
12/9/2007.....1.30 p.m.

"डोळे हे जादुगार...": भाग 2="प्रेयसी..."

"डोळे हे जादुगार...": भाग 2="प्रेयसी..."

काय करू? माझी प्रेयसी बोलतच नाही......

पण,
डोळ्यांच्या कोपर्‍यातून हसते तेव्हा,
शुक्र तार्‍यासारखी भासते....
कधी टापोर्‍या मोत्यांच्या लडीतून ती,
मुसमुसूनही रडते.....

डोळ्यांतूनच कधी निशब्दपणे ती,
स्वप्नेही मनी पेरते....
नि त्यांना साकार करण्याची जिद्द,
डोळ्यांतूनच देते....

डोळ्यांच्या बाहुल्या नाचवत ती,
अवखळही बनते.....
तर त्याच बाहुल्या स्थिरावून ती,
अवघड निर्णयही घेते....

अशी ही प्रेयसी माझी...
अबोल नि लाजाळू, अबोलीची कळी....
शब्दांपेक्षा जास्त तिला
ही नयनाची बोली......

पण खरं सांगतो मित्रांनो,

म्हणून मला तिचे डोळे
खूप खूप आवडतात......
तिच्या मनाची आंदोलने
ते माझ्यजवळ बोलतात........

रेणुका@ एक झोका.....चुके काळजाचा ठोका......
11/9/2007........4.40.....p.m.

"डोळे हे जादुगार" : भाग 1="फितूर डोळे झाले नसते तर.."

"डोळे हे जादुगार" भाग 1"फितूर डोळे झाले नसते तर.."

अशोकजी नेहमी छान छान अवतरण मला स्क्रॅप करत असतात.....त्यापैकी एक.....

अशोक : डोळे अनंत प्रकारचे असतात. विलक्षण वाचाळ असतात. पक्के अबोलही असतात. पाण्यासारखे पारदर्शक ही असतात आणि शाळिग्रामासारखे गोंडस पण थिजलेलेही असतात. कमळासारखे उमललेले असतात आणि संध्याछायांसारखे कोमेजलेलेही असतात. लपविणारे असतात आनी भलतेच ठकविणारेही असतात. डोळे श्रावणातल्या कोवळ्या ओलसर उन्हासारखे आल्हाददायक असतात नि वैशाख वणव्यासारखे रौद्र्प्रखरही असतात.काही डोळे जागच्या जागी बंदिस्त करणारे असतात. गारुड करणारे असतात. काही जिवाला दिलासा देणारे,शहाळ्याच्या पाण्यासारखे असतात.
(परमहंस * रवींद्र पिंगे )

या वरुन मला डोळ्यांवर काहीसे लिहावेसे वाटले आणि तेही मला लिही म्हणाले..........पण ज्या वेळी मी लिहायच्या दृष्टीने विचार करायला लागले, त्यावेळी मला खूप विषय एकाच वेळी सुचत होते......... मग नक्की कशावर लिहावे? म्हणून म्हटले 2-4 तरी कविता नक्की लिहिता येतील या जादुई डोळ्यांवर.....मग प्रयत्न केलाय लिहायचा म्हणून एकाच सदराखाली कविता भाग नंबर देऊन लिहीत आहे..... आवडतील की नाही माहीत नाही...... पण बघा वाचून....

"डोळे हे जादुगार......" भाग 1......"फितूर डोळे झाले नसते तर...."

गंभीर नि निश्चयी बनून आज मी,
नियतीसमोर झुकायला निघालेय.....
आतून जरी पूर्ण मोडलेय...... तरी,
आज त्याला तोडायला निघालेय.....

करारी बाणा, घातक निर्णय,
नि शब्दांची तळपती तलवार......
मात्र माझ्याच डोळ्यांची मला,
आडवी येत होती आज ढाल.........

तरीही, 'हो',... तरीही, कणखर बनून,
त्याला आज तोडायचेच होते.........
नि माझे अस्तित्व मलाच आज,
त्याच्या काळजातून पुसायचे होते....

इतके सगळे जमवलेही.... मी,
पण, फितूर डोळ्यांनी घात केला.....
नि माझा लटका कणखर बाणा,
क्षणात त्यांनी धुळीत मिळवला.......

फितूर डोळे झाले नसते,
तरचित्र नक्कीच वेगळे असते....
आम्ही रडलो कढलो जरी,
आमचे देह हयात असते.......

जीवित पणी नसलो जरी,
तरी,आज आम्ही खुश आहोत.....
मृत्यूनंतर एकरूप होऊन,
आज गालात हसत आहोत

रेणुका@एक झोका....चुके काळजाचा ठोका.....
11/9/2007......3.05 p.m.